पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्राणायामचे 10 फायदे

इमेज
  रोज प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढून ते निरोगी होतात.  विविध श्वासाच्या रोगांपासून मुक्ती मिळते.  राग, द्वेष आणि अपायकारक भावनांची निर्मिती होत नाही.  पचनक्रिया मजबूत होते.  प्राणायाम रोज केल्याने चांगली झोप येईल.  सर्व टेंशनपासून लढण्याची मानसिक क्षमता वाढते.  ध्यान केंद्रीत होते.  उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. हद्यांसंबंधी आजारापासून मुक्ती मिळते.  शरीर आंतरिक दृष्ट्या स्वस्थ आणि शुद्ध होते.  

श्लोका प्युरिफाइंग नीम आणि गोटाकोला फेस वाॅश

इमेज
नेहमी आपण नैसर्गिक आणि घरगुती उपाय बघतो पण आज आपण फेसवॉशचा रिव्हीव बघणार आहोत आणि मी स्वतः वापरल्यानंतर रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करतेय

मिठ टाकून पाणी पिण्याचे फायदे

इमेज
  ○ मिठाचे पाणी प्यायला ने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये         राहते. ○ मिठ टाकून पाणी प्यायल्याने तणावर कमी               होण्यास मदत होते. ○ शरीरावर कोणत्याही भागाला सूज आल्यास             मिठाचे  पाणी लावा. ○ मिठाचे पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.  ○ मिठ टाकलेले पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुधारते. ○ मिठामध्ये झिंक, सल्फर आणि आयोडीन सारखे        मिनरल्स असतात त्यामुळे त्वचेची सफाई होते. ○ मिठाच्या पाण्याने चूळ भरल्याने दात स्वच्छ              राहतात  आणि हिरड्या मजबूत होतात. ○ टॉन्सिल्स वाढल्यास सकाळी उठल्यावर मीठ           टाकलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने फायदा होतो. ○ मिठामध्ये असलेले मिनरल शरीरासाठी फायदेशीर     असतात. ○ मिठ टाकलेले पाणी प्यायल्याने लाळग्रंथी सक्रिय     होतात याचा परिणाम पचनशक्तीवर होतो.

त्वचेप्रमाणे नॅचरल टोनर

इमेज
                            तेलकट त्वचा                                                         (Oily Skin)   पुदिना टोनर (Mint Toner):  पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन ती पाण्यात उकळून घ्या. अर्क उतरलेले पाणी थंड झाल्यावर त्या पाण्यात तुरटी फिरवा त्यानंतर ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. आणि हे टोनर म्हणून रोज वापरा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास पुदिना मदत करतो.   तुळसी टोनर (Tulsi Toner):  तुळशीची पानं चुरडून उकळत्या पाण्यामध्ये सोडावी थंड झाल्यावर त्या पाण्यात एक चमचा कोरफडीचा गर  मिसळावा हे टोनर तुम्ही नियमित वापरा.                      कोरड्या त्वचेसाठी टोनर                                   ...

टोनरचे फायदे

इमेज
  त्वचेला तजेलदार करण्याचे काम टोनर करते. सुंदर त्वचा सगळ्यांनाच मिळत नाही काहींना याची काळजी घ्यावी लागते.  टोनरचे फायदे  टोनर त्वचेला पीएच बॅलन्स करण्यास मदत करते.  त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. टोनर केल्यास त्वचा मॉश्चराईज होते. पिंपल्स कमी करण्यास मदत करते. त्वचेला हायड्रेट करण्याचे काम टोनर करते.   चेहऱ्यावरील तेल कमी करते. टोनर केल्याने त्वचा मुलायम होते.  सौंदर्यासाठी आणि त्वचेसाठी टोनर महत्त्वाचे घटक आहे.

मिठाचे स्क्रब

इमेज
पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही घरी रोजच्या जेवणात वापरले जाणाऱ्या मिठाचे स्क्रब सोप्या पद्धतीने तयार केले जाऊ शकते.  मृत त्वचा रोम छिद्रांना बंद करते बंद छिद्रांमुळे पिंपल्स, ब्लॅक हेड, वाईट हेड अशा समस्यांचा सामना करावा लागतो पण या समस्यांना दूर करण्यासाठी फेशियल स्क्रब मदत करतो. स्क्रब तुमच्या बंद छिद्रांना  मोकळ करते .  घरच्या घरी मिठापासून स्क्रब कसे तयार करता येईल आणि स्क्रब करण्याचे नियम यावर टिप्स मिठाचे स्क्रब तयार करण्याचे प्रकार: ○ आपल्या आवडता तेलात मीठ टाकून स्क्रब करावे त्याने पिंपल्स कमी होतात. ○ काळा मिठाचे स्क्रब चांगले परिणाम करते एक चमचा मधात थोडे मीठ मिसळून लावल्याने सन टॅनिंग दूर करण्यास मदत होते. ○ डागरहीत त्वचेसाठी मिठात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून हलक्या हाताने स्क्रब करावे याने पिंपल्स, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात. स्क्रब करण्याचे नियम: ○ स्क्रब आठवड्यातून दोनदा करावे रोज करू नये. ○ स्क्रब नेहमी हलक्या हाताने करावे. ○ स्क्रब करण्याआधी चेहरा धुऊन घ्यावे. ○ दोन मिनिट मसाज केल्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाकावा.

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

इमेज
कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाहेर जाताना मास्क लावण, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचे तर आहेच पण त्याचबरोबर व्हायरस पासून बचाव होण्यासाठी काही टिप्स: ○ एलोवेरा ज्युसच्या सेवनाने कप कमी होण्यास मदत         होते. ○ दिवसातून किमान दोन ते तीन तुळशीची पानं चावून।       खावी. तुळशीचा चहा देखील घेऊ शकता. ○ खोकला असल्यास लवंगाची पूड व मध यांचे चाटण।       करून घेतल्याने आराम मिळतो. सुका खोकला।             असल्यास चाटणाच्या सेवनाने लवकर आराम मिळतो.  ○  बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने किमान दोन वेळा तर घरी         असणार्‍या व्यक्तीने एक वेळा वाफ घ्यावी. वाफ             घेताना  गरम पाण्यात हळद व सेंधा मीठ घालून देखील     वाफ घेता येऊ शकता. ○  तेजपत्ता, लवंग, मिरी, तुळस, गुळ, दालचिनी, अद्रक       किंवा सुंठ यांचा काढा घेतल्याने रोगप्रतिकारशक्‍ती         वा...

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

इमेज
पिंपल्स येण्याचे कारण म्हणजे हार्मोन्स असंतुलित, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, धूळ, प्रदूषण यामुळे पिंपल्स येतात.  चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पिंपल्स घालवण्यासाठी अनेक क्रीम, साबण, फेस वॉश, केमिकलयुक्त प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत पण या प्रोडक्टमुळे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही मग या ऐवजी नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची मदत घ्या.    पिंपल्सवर काही नैसर्गिक टिप्स तुमच्यासाठी: कोरफड कोरफड डाग, पिंपल्स, सुरकुत्या यावर रामबाण उपाय आहे. त्यातील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात त्याचबरोबर नैसर्गिक चमक येते. कोरफडीचा गर पाॅलीसकराइड आणि जिबरेलिंस यासारखे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच कोरफडीने त्वचा माॅइश्चराइझ होते.   लिंबू सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पाणी प्यावे. तसेच लिंबाचा रस व मध एकत्र करून चेहर्‍यावर लावून 15 मिनिटं ठेऊन चेहरा धुऊन घ्यावा  याचबरोबर रात्री झोपताना लिंबाचा रस चेहऱ्यावर लावून झोपावे. वाफ वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील गड्डे उघडतात त्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते. साधारणपणे चेहऱ्यावरील तेल...

FASHION आणि MASK

इमेज
         कोरोना आला आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील मास्कचे महत्व वाढले नाही तर यादी डॉक्टरांनशिवाय मास्कची तितकीशी गरज वाटत नव्हती. मास्कशिवाय घराबाहेर जाता येत नाही. आधी कपड्यांच्या रंगानुसार, Day - Night, कपड्याचा प्रकार, फंक्शन्स यानुसार लिपस्टिक निवडली जायची पण आता हे मास्कमुळे शक्य नाही मास्कमुळे चेहऱ्याचा अर्धा भाग झाकला जातो पण तुम्ही या मास्कसोबतही फॅशनेबल राहू शकता.  बाजारात वेगवेगळ्या रंगाचे मास्क उपलब्ध आहेत. तुम्ही घरी देखील छान मास्क बनवू शकता. फॅशनेबल दिसण्यासाठी काही टिप्स : ○एन-95 मास्क तुम्हाला कोरोनापासून तसेच प्रदूषणापासून बचाव करतो. या मास्क लोकप्रियता खूप आहे हे मास्क शॉर्टस्, एक्सरसाइज पॅन्ट, जॉगर, घातले असेल तर  छान लुक येतो. ○ सलवार सूट, कुर्ता, साडी, असे पारंपरिक कपडे परिधान केले असेल तर परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाचे मास्क, प्रिंटेड मास्क, कॉटन मास्क छान दिसतात. ○ तसेच भारतीय पेहराव्यासोबत निळ्या रंगाचे मास्क खुलून दिसतो  त्याचप्रमाणे वेस्टर्न वेअर सोबत सफेद रंगाचे मास्क छान दिसते. ○ सर्जिकल मास्कचा वापर देखील खूप केला ...

गुणकारी मौसंबी

इमेज
"मोसंबी" हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. मोसंबी चे फायदे मोसंबी हे विटामिन 'सी' भरपूर प्रमाणात असलेले फळ आहे. ​विटामिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ​मोसंबीचा ज्युस शरीरातील शक्ती वाढवते त्याचबरोबर अशक्तपणा असल्यास मोसंबी ज्यूस फायदेशीर ठरते. ​मोसंबीच्या नियमित सेवनाने त्वचा, डोळे, केस यासाठी फायदेशीर ठरते त्याचबरोबर त्वचा उजळते.  ​नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.  ​कोरोनावर दिल्या जाणाऱ्या औषधांबरोबरच विटामिन 'सी' तसेच रोग प्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ​मोसंबीचा ज्युस मध्ये मीठ टाकून पिणे अधिक फायदेशीर ठरते. ​मोसंबी मध्ये इतर पोषक तत्वे सुद्धा असतात.  ​मोसंबी मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते पोटासंबंधी समस्यांवर मोसंबी गुणकारी आहे.  ​मोसंबी हृदय रोग होण्यापासून बचाव करते त्याच बरोबर जे कोलेस्ट्रॉलची मात्र कमी करण्यास मदत करते.

पावसाळ्यात घ्या पायाची अशी काळजी

इमेज
  पावसाळ्यात घ्या पायाची अशी काळजी :  पावसाळा म्हणजे अनेकांचा आवडता ऋतू या ऋतूमध्ये बिजना फिरायला जाणं हे अनेकांना आवडते या सगळ्या गोष्टींचा आनंद घेताना  पायांचे सौंदर्य जपण्यासाठी काही टिप्स शक्यतो : 1. पाय कोरडे ठेवा पावसाळी चपलांचा वापर करा. 2. पावसाळ्यात बरेच ठिकाणी जागा घसरती असते त्यामुळे स्लीप होणाऱ्या चपलांचा वापर शक्यतो टाळा. 3. बाहेर जाऊन आल्यावर पायांच्या नखांमध्ये बसलेली माती वेळोवेळी साफ करा. 4. पायाला जखम झाली असल्यास योग्य ती क्रीम लावून जखम बरी करावी जखमेत घाण पाणी  किंवा माती शिरणार नाही याची काळजी घ्या.  5. पावसाळ्यात बाहेर जाऊन आल्यावर दोन दिवसातून एकदा तरी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात 10 ते 15 मिनिटे पाय पाण्यात ठेवावे याने पायाला आराम मिळतो. 6. सर्व बाजूंनी बंद असलेल्या चपला निवडू नयेत  7. पावसाळ्यात नखं वेळोवेळी कापावीत. 8. पायांकरिता चांगल्या माँईश्चरायझर चा वापर करावा.  अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पायाची काळजी घेऊन तुमच्या पायांचं सौंदर्य वाढवू शकता.