श्लोका प्युरिफाइंग नीम आणि गोटाकोला फेस वाॅश
नेहमी आपण नैसर्गिक आणि घरगुती उपाय बघतो पण आज आपण फेसवॉशचा रिव्हीव बघणार आहोत आणि मी स्वतः वापरल्यानंतर रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करतेय
चेहऱ्यावरील धूळ काढून टाकण्यासाठी फेस वॉश उत्तम पर्याय आहे. चेहऱ्यावर असलेल्या छिद्रांमध्ये ही धूळ गोळा होते. ही काढणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून चेहरा स्वच्छ करण्याचे काम फेस वॉश करते.
माझी त्वचा तेलकट आहे मी वेगवेगळे फेसवॉश ट्राय केले त्यापैकी हा माझा शेवटचा फेस वॉश शेवटचा यासाठी कारण या फेस वॉशच्या रिझल्टनंतर दुसरा ट्राय करून बघण्याची आवश्यकता वाटली नाही. या फेस वॉशच नाव श्लोका प्युरिफाइंग नीम अॅण्ड गोटाकोला असे आहे. हे फेस वॉश शुद्ध कडुलिंब आणि गोटाकोलाने बनलेले आहे चेहऱ्याला कोरडेपणा न देता चेहऱ्यावरील धुळ आणि अतिरिक्त तेल काढून त्वचेला तजेलदार करण्याचे काम करते.
किंमत :
60 ML - Rs.198
फेस वॉश सुगंध हलका आणि ताजा आहे फेस वॉशचा रंग हलका हिरवा आणि पारदर्शक जेल स्वरूपात आहे.
पॅकेजिंग :
या फेस वॉशचे पॅकेजिंग चकचकीत सिल्वर रंगात आहे.
अनुभव :
माझी त्वचा तेलकट आहे. दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे गरजेचे आहे. हे फेस वॉश मला खूप आवडले. श्लोका प्युरिफाइंग नीम गोटाकोला फेस वॉशच्या वापरानंतर त्वचा नरम आणि गुळगुळीत होते त्याचबरोबर ताजेतवाने वाटते. चेहरा छान स्वच्छ होतो याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर असलेले पिंपल्स कमी होतात. फेस वॉश मध्ये असलेले नीम पिंपल्ससाठी गुणकारी आहे.
फायदे :
- त्वचा कोरडी करत नाही
- पिंपल्स कमी करण्यास मदत
- त्वचेला तजेलदार बनते
- चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते
- कोणतेही नाही



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा