FASHION आणि MASK
कोरोना आला आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील मास्कचे महत्व वाढले नाही तर यादी डॉक्टरांनशिवाय मास्कची तितकीशी गरज वाटत नव्हती. मास्कशिवाय घराबाहेर जाता येत नाही. आधी कपड्यांच्या रंगानुसार, Day - Night, कपड्याचा प्रकार, फंक्शन्स यानुसार लिपस्टिक निवडली जायची पण आता हे मास्कमुळे शक्य नाही मास्कमुळे चेहऱ्याचा अर्धा भाग झाकला जातो पण तुम्ही या मास्कसोबतही फॅशनेबल राहू शकता.
बाजारात वेगवेगळ्या रंगाचे मास्क उपलब्ध आहेत. तुम्ही घरी देखील छान मास्क बनवू शकता.
फॅशनेबल दिसण्यासाठी काही टिप्स :
○एन-95 मास्क तुम्हाला कोरोनापासून तसेच प्रदूषणापासून बचाव करतो. या मास्क लोकप्रियता खूप आहे हे मास्क शॉर्टस्, एक्सरसाइज पॅन्ट, जॉगर, घातले असेल तर छान लुक येतो.
○ सलवार सूट, कुर्ता, साडी, असे पारंपरिक कपडे परिधान केले असेल तर परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाचे मास्क, प्रिंटेड मास्क, कॉटन मास्क छान दिसतात.
○ तसेच भारतीय पेहराव्यासोबत निळ्या रंगाचे मास्क खुलून दिसतो त्याचप्रमाणे वेस्टर्न वेअर सोबत सफेद रंगाचे मास्क छान दिसते.
○ सर्जिकल मास्कचा वापर देखील खूप केला जातो हे मास्क कोणत्याही कपड्यांवर शोभून दिसते.
○ तसेच आत्ता अनेकांनी फॅशन म्हणून डायमंडचे मास्क, सोन्याचे मास्क बनून घेतले आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाचे फॅशनेबल मास्क उपलब्ध आहेत पेहराव्यानुसार मास्कची निवड करा आणि फॅशनचे गणित सोडवा.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा