पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

पिंपल्स येण्याचे कारण म्हणजे हार्मोन्स असंतुलित, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, धूळ, प्रदूषण यामुळे पिंपल्स येतात. 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पिंपल्स घालवण्यासाठी अनेक क्रीम, साबण, फेस वॉश, केमिकलयुक्त प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत पण या प्रोडक्टमुळे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही मग या ऐवजी नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची मदत घ्या.   

पिंपल्सवर काही नैसर्गिक टिप्स तुमच्यासाठी:

  • कोरफड

कोरफड डाग, पिंपल्स, सुरकुत्या यावर रामबाण उपाय आहे. त्यातील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात त्याचबरोबर नैसर्गिक चमक येते. कोरफडीचा गर पाॅलीसकराइड आणि जिबरेलिंस यासारखे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच कोरफडीने त्वचा माॅइश्चराइझ होते.  

  • लिंबू
सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पाणी प्यावे. तसेच लिंबाचा रस व मध एकत्र करून चेहर्‍यावर लावून 15 मिनिटं ठेऊन चेहरा धुऊन घ्यावा  याचबरोबर रात्री झोपताना लिंबाचा रस चेहऱ्यावर लावून झोपावे.
  • वाफ

वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील गड्डे उघडतात त्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते. साधारणपणे चेहऱ्यावरील तेल, धूळ आणि हानीकारक बॅक्टेरिया कमी होतात म्हणून वाफ घेणे पिंपल्ससाठी लाभदायक ठरते.
  • कडूनिंब

कडुनिंबाची पानं वाटून त्यात हळद घालुन ते पिंपल्सवर लावावा त्याने फायदा होतो तसेच कडुनिंबाची पानं पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करावी.
  • संत्र्याची साल

संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर बनवावी पावडर आणि मध एकत्र करून लावल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होत त्याचबरोबर त्वचा उजळते.

पिंपल्स फोडू किंवा खाजवू नये यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते तसेच तळलेले पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड खाणे टाळावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK