त्वचेप्रमाणे नॅचरल टोनर

                            तेलकट त्वचा                                                       (Oily Skin) 

पुदिना टोनर (Mint Toner): 


पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन ती पाण्यात उकळून घ्या. अर्क उतरलेले पाणी थंड झाल्यावर त्या पाण्यात तुरटी फिरवा त्यानंतर ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. आणि हे टोनर म्हणून रोज वापरा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास पुदिना मदत करतो.  

तुळसी टोनर (Tulsi Toner): 


तुळशीची पानं चुरडून उकळत्या पाण्यामध्ये सोडावी थंड झाल्यावर त्या पाण्यात एक चमचा कोरफडीचा गर  मिसळावा हे टोनर तुम्ही नियमित वापरा. 

                   कोरड्या त्वचेसाठी टोनर                                                 (Dry Skin) 

एलोवेरा टोनर (Aloe Vera Toner):


एलोवेरा गर काढून तो गर तसा चेहऱ्यावर लावू शकतात. किंवा गरात पाणी घालून वाटून चेहर्‍यावर लावा 20 मिनिटानंतर चेहरा धुऊन घ्या. एलोवेरा चेहऱ्याला मॉइश्चराईज करण्याचे काम करते.

            पिंपल्स असणाऱ्या त्वचेसाठी टोनर                                   (Acne Prone Skin) 

अॅप्पल साइडर व्हिनेगर टोनर (Apple Cider Toner):


अॅप्पल साइडर व्हिनेगर चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास मदत करते. अॅप्पल साइडर व्हिनेगर आणि तितकेच पाणी घेऊन चेहऱ्याला लावू शकता.

कडूनिंब टोनर(Neem Toner): 


तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील तर ते या टोनरने कमी होण्यास मदत होते. कडुनिंब पिंपल्ससाठी गुणकारी आहे. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या ते पाणी थंड झाल्यावर वापरा.

                       नाजूक त्वचेसाठी                                                  (Sensitive Skin)

टोमॅटो टोनर (Tomato Toner):

त्वचा नाजूक असेल तर नैसर्गिक उपाय करणे उत्तम ठरते. नैसर्गिक उपायांमुळे त्वचेला त्रास होत नाही. टोमॅटोचा रस काढून तो चेहऱ्याला लावावा. कोरड्या त्वचेसाठी टोमॅटो हे उत्तम होणार आहे.

गुलाब पाणी (Rose Water):

गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर ते पाणी गाळून घ्या त्याचं टोनर म्हणून वापर करा. मार्केटमध्ये रेडिमेट गुलाब पाणी मिळते परंतु घरी तयार केलेले गुलाब पाणी नेहमी चांगले.
                     
                       *************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK