त्वचेप्रमाणे नॅचरल टोनर
तेलकट त्वचा (Oily Skin) पुदिना टोनर (Mint Toner): पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन ती पाण्यात उकळून घ्या. अर्क उतरलेले पाणी थंड झाल्यावर त्या पाण्यात तुरटी फिरवा त्यानंतर ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. आणि हे टोनर म्हणून रोज वापरा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास पुदिना मदत करतो. तुळसी टोनर (Tulsi Toner): तुळशीची पानं चुरडून उकळत्या पाण्यामध्ये सोडावी थंड झाल्यावर त्या पाण्यात एक चमचा कोरफडीचा गर मिसळावा हे टोनर तुम्ही नियमित वापरा. कोरड्या त्वचेसाठी टोनर ...